Posts

" नीरज - वात्सल्याची मातृसंहिता "

Image
" नीरज - वात्सल्याची मातृसंहिता..! " मुलाने किंवा मुलीने आई- वडिलांबद्दल लिहिलेली अनेक पुस्तकं मराठी भाषेत वाचायला मिळतात. त्यामध्ये मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र म्हटल्या गेलेल्या 'श्यामची आई' पासून ते मुलाच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या अडाणी बापाची कथा सांगणाऱ्या 'आमचा बाप अन् आम्ही' पर्यंत अनेकविध वाङ्मयप्रकारांमधली कित्येक पुस्तकांचा समावेश केला जाऊ शकतो. पण एखाद्या आईने किंवा बापाने आपल्या मुलाबद्दल लिहिलेली पुस्तकं किती असतील? खूप कमी! असतील.. किंवा नसतीलही! पण नुकतंच माझ्या वाचनात असं एक पुस्तक आलंय. एका आईने काळजाचा कागद अन् अश्रूंची शाई करून आपल्या मुलाच्या जागवलेल्या आठवणींचं पुस्तक. 'नीरज'.             नीरज. एक अतिशय हुशार मुलगा. जगभरातल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळवण्यासाठी धडपडणारा. केवळ ज्ञान मिळवून थांबणारा नाही तर त्या ज्ञानाचं विश्लेषणही करणारा. जितका हुशार तितकाच संवेदनशीलही.शब्द सूर संगीताची आवड आणि जाण असणारा. रंगरेषांवर प्रभुत्व असणारा. विविध कला गुण संपन्न असा हा नीरज. पण दुर्दैवाने नीरजचं हृदय जन्...

" सहज, सोप्या, सुंदर संस्कारकथा - लाल दिनांक"

Image
" सहज सोप्या सुंदर संस्कार कथा - लाल दिनांक " ज्येष्ठ विनोदी साहित्यिक म्हणून श्री नागेश शेवाळकर मराठी साहित्य विश्वाला सुपरिचित आहेत. अर्थात त्यांची ओळख तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. ते उत्तम चरित्रकार आहेत. आणि मुलांच्या भावविश्वात रममाण होऊन लिहिणारे बालसाहित्य निर्माते देखील आहेत. त्यांच्या श्यामच्या छान छान गोष्टी महाराष्ट्र भरातील शाळांमधून विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्या आहेत. यावेळी त्यांनी बालकांसाठी अशाच छानदार गोष्टींचं पुस्तक आणलंय. ज्याचं नाव आहे - लाल दिनांक. लाल दिनांक म्हणजे सुटीचा दिवस. मुलांच्या आवडीचा दिवस. म्हणूनच तर नव्या वर्षाचं कॅलेंडर घरात आलं की ही छोटी मंडळी लाल दिनांकाचा शोध घेत राहते.       या कथासंग्रहात छोट्या छोट्या १५ कथा वाचायला मिळतात. यातली प्रत्येक कथा बालवाचकांना आवडेल अशीच आहे. शेवाळकर सर स्वतः शिक्षक राहिलेले आहेत. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला आहे. शाळकरी मुलांच्या आवडीनिवडीचा त्यांना चांगलाच अभ्यास आहे. त्यामुळे मुलांना वाचायला काय आवडतं हे समजून घेऊनच या संग्रहातील कथांची मांडणी लेखकाने केली आहे. मग त...

" सहज भावनांची शब्दफुले "

Image
" सहज भावनांची शब्दफुले " मला असं वाटतं की ज्याला दुसऱ्यांच्या वेदना कळतात अशा प्रत्येक संवेदनशील माणसामध्ये एक कवी दडलेला असतो. बऱ्याचदा तो बाहेर पडतो कित्येकांच्या बाबतीत तो मनातच दडून राहतो. पण खरंतर आपल्या मनातल्या भावनांना वाट करून देण्याचं माध्यम प्रत्येकाने शोधलं पाहिजे. कारण मनात दडपलेल्या बऱ्याचशा भावना आतल्या आतच गुदमरून जातात आणि त्या व्यक्तीचं व्यक्तीमत्वही कुठेतरी संकोचून गेल्यासारखं वाटतं. आयुष्याला आनंदाने तोंड देण्यासाठी आपली व्यक्त होण्याची माध्यमं आपण ठरवून घेतली पाहिजेत. हे सगळं आज मांडण्यासाठी निमित्त ठरलाय नुकताच वाचनात आलेला एक कवितासंग्रह. कवी डॉ. गोपाळ विठोबा तुपकर रचित 'अंतरीची शब्दफुले'.            डॉ. तुपकर सर पेशाने प्राथमिक शिक्षक आहेत. खरं तर आपण डॉक्टर व्हायचं अशी त्यांची दृढ इच्छा होती. बुद्धिमत्ता दांडगी असूनही आर्थिक गणित न जुळल्यामुळे त्यांना वैद्यकीय शिक्षण घेता आले नाही. ते शिक्षक झाले. परंतू डॉक्टर होण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच की काय नावापुढे डॉ. लावण्याचा वेगळा...

"फरदड - शोषितांच्या होरपळीच्या कथा"

Image
" फरदड - शोषितांच्या होरपळीच्या कथा "  शेतकरी बांधवांचे दारिद्र्य, त्यांची दुरावस्था, त्यांच्या जीवनाची होरपळ कथा / कविता / कादंबरीच्या माध्यमातून आज  महाराष्ट्रातील कितीतरी कवी -लेखक मांडत आहेत. अगदी ज्येष्ठ लेखक प्राचार्य रा. रं. बोराडे, प्रा. भास्कर चंदनशिव यांच्यापासून कृष्णात खोत, ' फेसाटी ' कार नवनाथ गोरे यांच्यापर्यंत ही परंपरा सांगता येईल. मराठवाड्यात डॉ.आसाराम लोमटे, प्रा.केशव सखाराम देशमुख, डॉ. भीमराव वाघचौरे,प्रा.इंद्रजित भालेराव, विजय जावळे, उत्तम बावस्कर,उमेश मोहिते, भास्कर बडे, सरदार जाधव यांच्यानंतर लिहीणाऱ्यांची एक पिढीच गेल्या दशकात उदयास आली आहे. राजेंद्र गहाळ, अशोक गायकवाड, अब्दुल हकीम, राजेश रेवले, मेनका धुमाळे, अनिता येलमटे ही काही आजच्या पिढीतील नांवे असून श्री. शिरीष पद्माकर देशमुख हे त्यांच्यातीलच एक नांव ! कवी म्हणून सुपरिचित झालेल्या श्री. शिरीष पद्माकर देशमुख यांचा ' फरदड ' हा पहिलाच कथासंग्रह. यातल्या कथा शेतकरी -कष्टकरी वर्गाच्या अपार आणि असीम कष्टाच्या आहेत. त्यांचे सावकाराकडून किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडून होणारे शोषण चित्रीत करणाऱ...